ताज्या घडामोडी

वर्धा जिल्हा रुग्णालयातील ‘स्टोअर रूम’ला आगशॉर्टसर्किट झाल्याने उडाला भडका : सुदैवाने कुणाला दुखापत नाही, प्रशासनाची उडाली धावपळ

AB7News

वर्धा जिल्हा रुग्णालयातील ‘स्टोअर रूम’ला आगशॉर्टसर्किट झाल्याने उडाला भडका : सुदैवाने कुणाला दुखापत नाही, प्रशासनाची उडाली धावपळ

वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक-२ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. तत्काळ लगतच्या वॉर्डातील रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करून अग्निशमन बंबाने पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. यात खोलीतील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक २ मध्ये असलेल्या ‘स्टोअर रूम’ला दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या खोलीत ब्लॅकेट, औषधीच्या बाटल्या व इतर साहित्य तसेच काही कागदपत्रे होती. ते सर्व जळून खाक झाले. आगीने रौद्ररूप धारण करताच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी धाव घेत इमारतीतील रुग्णांना इतरत्र स्थलांतरित केल्याने मोठी दुर्घटना टळली. तत्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. जवळपास दोन ते तीन अग्निशमन बंबाने पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक संतोष ताले, पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते.बाजूलाच होता बालरुग्ण विभागजिल्हा रुग्णालयातील इमारत क्रमांक २ मधील दुसऱ्या माळ्यावर ज्या खोलीत आग लागली त्याच्या बाजूलाच बालरुग्ण विभाग होता. आगीचे लोळ उठताना दिसताच तातडीने इमारतीतील रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले. वेळीच उपाययोजना सुरू केल्याने कुणालाही दुखापत झाली नाही.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.