ताज्या घडामोडी

महिला आरोपीचे आत्मसमर्पण

मारेगाव : केटरिंगच्या कामावरीलएका अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशात पळवून नेले होते. या प्रकरणातील महिला आरोपी मंगळवारी स्वतः मारेगाव पोलिसांपुढे शरण आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलिस कोठडीचे आदेश दिले.मारेगाव शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील १७ वर्षीय मुलगी १४ नोव्हेंबरला वणी येथेकामाला गेली; परंतु घरी परतली नाही. संध्याकाळी आईने चौकशी केली असता, तिचा फोन बंद होता. १९ नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील नागदा पोलिस ठाण्यातून अपहृत मुलीने आईला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने २१ नोव्हेंबरला मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीला मारेगाव येथे आणून आरोपी महिला माधुरी चांदेकर हिच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र, आरोपी महिला तेंव्हापासून फरार होती.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.