अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे *आमदार साजिद खान पठाण* यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेत विविध विभागांची पाहणी केली
Akola B7
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे *आमदार साजिद खान पठाण* यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेत विविध विभागांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान काही ठिकाणी असलेल्या असुविधा यांवर प्रकाश टाकत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. तर यावेळी साफसफाईचा असलेला अभाव बघता सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. या आढावा बैठक आणि भेटी दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये आणि इतर अधिकारी वर्ग, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, अध्यक्ष महानगर कॉंग्रेस अल्पसंख्यक विभाग तथा नगरसेवक मो. इरफान, रवी शिंदे, आकाश कवडे, मो. युसुफ, अंकुश पाटील, राहुल सारवान, इरफान कासमानी आदी उपस्थित होते.