ताज्या घडामोडी
चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे भगवान जाधव आणि आशाबाई जाधव या दाम्पत्याने शेतात उंबराच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या
Akola B7 News
जळगावात पती-पत्नीने एकाच दोरीने संपवली जीवनयात्रा; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे भगवान जाधव आणि आशाबाई जाधव या दाम्पत्याने शेतात उंबराच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरापासून जवळच घडलेल्या या घटनेने दोन लहान मुले पोरकी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.