ताज्या घडामोडी

बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडीला मुदतवाढ आता १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत

अकोला : अकोला-शेगाव-भूसावळ मार्गे धावणारी बडनेरा-नाशिक रोड या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.गाडी क्रमांक 01211 बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दिनांक 31.12.2025 पर्यंत चालविण्याचे अधिसूचित करण्यात आले होते, ती आता 01.01.2026 ते 28.02.2026 या कालावधीत वाढविण्यात आली आहे. (एकूण 59 फेऱ्या)नाशिक रोड – बडनेरा अनारक्षित दैनिक विशेषतसेच गाडी क्रमांक 01212 नाशिक रोड – बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दिनांक 31.12.2025 पर्यंत चालविण्याचे अधिसूचित करण्यात आले होते, ती आता 01.01.2026 ते 28.02.2026 या कालावधीत वाढविण्यात आली आहे. (एकूण 59 फेऱ्या)वरील दोन्ही गाड्यांच्या वेळापत्रकात, संरचनेत व थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.या विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी ————–असा आहे मार्गबडनेरा (सकाळी 10.05 वाजता),मूर्तिजापूर (सकाळी 10.30 वाजता), बोरगाव सकाळी 10.48 वाजता, अकोला सकाळी 11.02 वाजता, शेगाव सकाळी 11.33 वाजता, नांदुरा (दुपारी 12.03 वाजता), मलकापूर (दुपारी 12.38 वाजता), बोदवड (दुपारी 1.37वाजता), भुसावळ (दुपारी 3.00 वाजता), जळगाव (दुपारी 3.35 वाजता), पाचोरा (दुपारी 4.05 वाजता), चाळीसगाव (दुपारी 4.38 वाजता), नांदगाव (दुपारी 5.20 वाजता), मनमाड (दुपारी 5.50 वाजता), लासलगाव (संध्याकाळी 6.05 वाजता), निफाड (6.25 वाजता), नाशिक (रात्री 7.05 वा.)

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.