घरात राहायला गेले, पण बिल्डिंग ‘कम्प्लिशन’ सर्टिफिकेट घेतले का
वाशिम : स्वतःचे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरबांधून पूर्ण झाले की आपण गृहप्रवेश करतो; मात्र तुमचे घर किंवा इमारत कायदेशीररीत्या पूर्ण झाली आहे का? याचे प्रमाणपत्र म्हणजेच ‘बांधकाम पूर्णत्वाचा दाखला’ तुम्ही घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाशिम शहरात नवीन इमारतींची संख्या वेगाने वाढत आहे, नियमानुसार हा दाखला घेणे आवश्यक आहे. बीसीसी नसल्यास तुमच्या घराची नोंदणी, वीज-पाणी जोडणी आणि भविष्यातील विक्रीमध्ये मोठ्या कायदेशीर अडचणी येऊ शकतात.वीज-पाणी, रजिस्ट्री, खरेदी-विक्रीसाठी आवश्यकमालमत्तेची अधिकृत नोंदणी (रजिस्ट्री) करण्यासाठी बीसीसी आवश्यक असतो. तसेच, घराची विक्री करायची असल्यास किंवा बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास बँका या प्रमाणपत्राची मागणी करतात. कायमस्वरूपी वीज आणि पाणी जोडणीसाठी देखील हा दाखला अनिवार्य आहे.बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे काय ?बांधकाम पूर्णत्वाचा दाखला हा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत (नगरपरिषद, नगरपंचायत) दिला जाणारा एक कायदेशीर दस्तऐवज आहे. इमारत मंजूर नकाशाप्रमाणे आणि सर्व नियमांचे पालन करून बांधली गेली आहे, तसेच ती राहण्यासाठी सुरक्षित आहे, याचे हे अधिकृत प्रमाणपत्र असते.’बीसीसी’ नसेल तर घरात राहणेसुद्धा ठरते अवैधकायदेशीर भाषेत सांगायचे तर, जोपर्यंत पालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला मिळत नाही, तोपर्यंत त्या इमारती त्या इमारतीत राहणे ‘अवैध’ मानले जाते. नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या इमारतींना हा दाखला मिळत नाही आणि भविष्यात अशा बांधकामांवर पाडकामाची टांगती तलवार असू शकते.घर बांधकामासाठी लाखो रूपये खर्च होतात. मात्र अनुचित प्रसंग घडल्यास मोठा संघर्ष करावा लागते. त्यामुळे घर बांधकामामुळे आनंद मिळण्याऐवजी दुःख वाट्यास येते. त्यामुळेच बीसीसी मागून घ्यावे.अनेकदा ग्राहक घर स्वस्त मिळवण्याच्या नादात किंवा घाईमुळे पूर्णत्वाच्या दाखल्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, अधिकृत बिल्डर नेहमी नियमांचे पालन करून बीसीसी मिळवूनच ताबा देतात. ग्राहकांनी घर घेताना खात्री करावी.घराच्या बांधकामाचा महत्त्वाचा वैध दस्तऐवजकेवळ जमिनीची रजिस्ट्री असणे म्हणजे घर कायदेशीर असणे नव्हे. जोपर्यंत प्रशासनाकडून बीसीसी मिळत नाही, तोपर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे मानले जात नाही. कोणत्याही कायदेशीर वादात हा दाखला घराच्या वैधतेचा सर्वात मोठा पुरावा ठरतो.भोगवटा प्रमाणपत्र घेणेही महत्त्वाचेबीसीसीसोबतच भोगवटा प्रमाणपत्र’ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे प्रमाणपत्र असल्याशिवाय इमारतीत वास्तव्यास परवानगी नसते. बीसीसी बांधकाम पूर्ण झाल्याचे सांगते, तर ओसी ती इमारत राहण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करते.बीसीसी’ कुठून मिळवायचे, काय आहे नेमकी प्रक्रिया ?बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित इंजिनिअर किंवा आर्किटेक्टमार्फत नगरपालिकेकडे अर्ज करावा लागतो. पालिकेचे पथक इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करते.मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम असल्यास आणि अग्निशमन व इतर सुरक्षा नियमांची पूर्तता झाली असल्यास पालिका हा दाखला प्रदान करते. ही सर्व प्रक्रिया बिल्डरच्या माध्यमातून केली जाते.