खोपोलीत नगरसेविकेच्या नवऱ्याचा खून, मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना घडली घटना
रायगडमधील खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचा नवरा मंगेश यांचा अज्ञात इसमांनी खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश हे आज सकाळी मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरुन घराकडे परतत होते. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी गाडीतून आलेल्या ३ ते ४ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करत त्यांचा खून केला.
बीडमध्ये जुन्या वादाचा राग मनात धरुन पत्नीने केला पतीचा खून, नागरिकांमध्ये खळबळ
शिरुर ताजबंद (ता. अहमदपूर, जि. बीड) गावात पत्नीने पतीचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित पती प्रशांत गायकवाड (३६) दारुच्या नशेत असताना जुन्या वादाचा राग मनात धरुन पत्नी अर्चनाने त्याचे डोके भिंतीवर आपटले आणि नंतर दोरीच्या साहाय्याने गळा आवळून त्याचा खून केला. दरम्यान, घटनेनंतर अर्चनाने प्रशांत बेशुद्ध पडल्याचे सांगत दीर प्रवीण गायकवाड यांना फोन करुन घरी बोलावले होते.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डॉक्टर बायकोशी पटेनासे झालं, पुण्यात २४ तासात घेतला घटस्फोट
लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सुरू झालेल्या वादामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अवघ्या ८ दिवसांत एका दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. पती एका जहाजावर मोठ्या पदावर कार्यरत असून पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहे. या दोघांनी १८ महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता मात्र वाद होत असल्याने लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय