महिलेच्या बॅगमधील सोने व रोख लंपास !
अकोला: शहरातील दुर्गा चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या दाम्पत्याच्या बॅगमधून ४५ हजार रुपयांचे सोने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना गुरुवारी समोर आली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नेपा नगर, मध्य प्रदेश येथील रहिवासी व सध्या एसबीआय कॉलनी, लहान उमरी, अकोला येथे मुक्कामास असलेल्या दुर्गा जगदीशदुपारी सुमारे ३:३० वाजता घरी परतल्यानंतर बॅग तपासली असता ऐवज गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.उमाळे (६२) यांच्या तक्रारीनुसार, त्या व त्यांचे पती जगदीश उमाळे हे २३ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. ओपीडीमध्ये नंबर लावण्यासाठी बसले असताना डॉक्टरांनी तपासणी केली. वैद्यकीय रिपोर्ट येण्यास वेळ लागणार असल्याने दुर्गा उमाळे या जेवणासाठीखालील खोलीत गेल्या. दरम्यान, त्यांच्या पतीजवळ ठेवलेल्या लेडीज बॅगमध्ये ३ ग्रॅम वजनाच्या जुन्या वापरातील सोन्याच्या साखळ्या, ४ ग्रॅम वजनाचे टॉप्स व ५ हजार रुपये रोख रक्कम होती.रुग्णालयात चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन अनोळखी महिला २३ डिसेंबर रोजी दुपारी २:३४ वाजताच्या सुमारास बॅगमधील सोने व रोख रकमेची चोरी करताना दिसून आल्या. रामदासपेठ पोलिस पुढील तपास करीत आहेत.