भाजप-राष्ट्रवादी युतीचा प्रचार जोरात; पदयात्रा, जनसंवाद अन् पक्षप्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महानगरपालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) युतीचा प्रचाराचा झंझावात सुरू असून, जनसंवाद, पदयात्रा, प्रचार कार्यालयांची उद्घाटने आणि पक्षप्रवेश यामुळे प्रचारात युतीने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
युतीतर्फे मंगळवारी प्रभाग क्रमांक २० मध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर प्रभाग क्र. १३ मध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, तर प्रभाग क्र. १० मध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासह पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हे सर्व कार्यक्रम आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, युतीचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसून येत आहे. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांच्यासह खासदार अनुप धोत्रे, राष्ट्रवादी (अजित पवार) चे शहराध्यक्ष विजयराव देशमुख, भाजप महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल, डॉ. किशोर मालोकार, श्रावण इंगळे, योगेश मानकर, छोटूभाऊ लुंगे व युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.रिंग रोडवर घरोघरी संवादकौलखेड चौक ते तुकाराम चौक या रिंग रोडवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भव्य पदयात्रा काढली. ही पदयात्रा केवळ रस्त्यापुरती मर्यादित न ठेवता, प्रत्येक घरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला.नागरिकांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेत विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधण्यात आला. या पदयात्रेत प्रभाग क्र. २०चे उमेदवार विनोद मापारी, शारदा ढोरे, सोनाली अंधारे व मंगेश झिने उपस्थित होते. तसेच खडकी परिसरातही घरोघरी भेट देत जनसंवाद साधण्यात आला.खासदार धोत्रेचा संवादखासदार अनुप धोत्रे यांनी महिलाशक्तींशी संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. ‘लाडकी बहीण’ योजना, ‘लखपती दीदी’ योजना या महिलांसाठी फायदेशीर असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचा विकास हाच कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
प्रभाग ८, ९ मध्ये सभा
अकोला : नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची आमदार गोवर्धन शर्मा यांनी सुरू केलेली परंपरा भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जोमाने पुढे नेत आहे, असे प्रतिपादन भाजप माजी शहराध्यक्ष व व्यापारी नेते किशोर पाटील यांनी केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ आणि २ मध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रचारात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांनी समाजातील नागरिकांच्या वैयक्तिक समस्या, तसेच मूलभूत सुविधांकडे लक्ष देत सातत्याने विकासात्मक कामे केली आहेत. याच विकासाच्या धर्तीवर नव्या जोमाने युवक उमेदवारांना संधी देण्यात आली असून, युतीचे उमेदवार हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ८ मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ किशोर मांगटे पाटील यांनी उमेदवारांसह गणमान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी उमेदवार रंजना विंचनकर, माधुरी क्षीरसागर यांच्यासह तुषार भिरड, राजेश्वर धोटे, डॉ. लव्हाळे, बंडू नायसे, पप्पू वानखडे, शरद इंगळे, शाम विंचनकर, जीवन सपकाळ, जयंतराव जोशी, पीयूष मानकर, वसंतराव पोहरे, रामदास पोहरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.