ताज्या घडामोडी

एकीकडे निकालांची धामधूम, तर दुसरीकडे राज  ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये:

AB7News

एकीकडे निकालांची धामधूम, तर दुसरीकडे राज  ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये:

मुंबईत काय घडत आहे?राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना, मनसे अध्यक्ष Raj ठाकरे मुंबईत सक्रिय झाले आहेत राज  ठाकरे हे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये असून, आज पश्चिम उपनगरातील आठ महत्त्वाच्या शाखांचे उद्घाटन करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणार आहेत.सध्या राज्यातील अनेक नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने सुरुवातीच्या प्राथमिक कलांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून यावर जोरदार जल्लोष होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. त्यांनी पश्चिम उपनगरातील कार्यालयांचे उद्घाटन करून पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू केले आहे.राज  ठाकरेचा मुंबई दौरा राज ठाकरे हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी दक्षिण आणि पूर्व उपनगरांत आपले शक्तीप्रदर्शन केले. आज सकाळी Raj ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानाहून रवाना झाले. त्यांनी पश्चिम उपनगरातील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर (शाखा ५६), मालाडमधील एच पी शॉपिंग सेंटर (शाखा ४६), दत्ता मंदिर रोड (शाखा ३६), कुरार व्हिलेज (शाखा ३७), बोरीवली पश्चिमेकडील सत्यविजय सोसायटी (शाखा १८), एक्सर मच्छी मार्केट (शाखा १०), दहिसर पश्चिमेतील रामचंद्र पावसकर मार्गावरील शाखा (शाखा ७) आणि जोगेश्वरी पूर्वातील JVLR जवळील शाखा ७४ चे उद्घाटन केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.