क्रीडा व मनोरंजन

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, तपासात धक्कादायक माहिती समोर

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनानंतर सिनेविश्वात खळबळ... घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह... तपासात धक्कादायक माहिती आली समोर..., दिग्दर्शकाच्या निधनानंतर पोलीस करत आहेत कसून चैकशी...

सिनेविश्वातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कन्नड सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शकाचं निधन झालं आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचं निधन झालं आहे. गुरुप्रसाद यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून रिऍलिटी शोच्या परीक्षकाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली आहे. वयाच्या 52 व्या वर्षी गुरुप्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या निधनामुळे खळबळ माजली आहे. गुरुप्रसाद यांचा मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला. गुरुप्रसाद रविवारी त्यांच्या बेंगळुरूमधील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. ते गेल्या 8 महिन्यांपासून उत्तर बेंगळुरूमधील मदननायकनहल्ली भागात राहत होते.

गुरुप्रसाद यांच्या निधनानंतर पोलिसांनी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच दिग्दर्शकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. गुरुप्रसाद यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. गुरुप्रसाद यांच्या निधनामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

रिपोर्टनुसार, गुरुप्रसाद आर्थिक संकटाशी झुंजत होते. रंगनायका या सिनेमाच्या अपयशामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. त्यांच्यावर खूप कर्ज होतं त्यामुळे गुरुप्रसाद नैराश्याचा बळी ठरल्याची माहिती देखील समोर येत आहे. सिनेमा यावर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. मात्र, ‘रंगनायका’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला.

दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी गुरुप्रसाद यांनी अभिनय क्षेत्रात देखील काम केलं होतं. 2006 मध्ये गुरुप्रसाद यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. ‘माता’ सिनेमात गुरुप्रसाद झळकले होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील हीट ठरला. ज्यामुळे गुरुप्रसाद यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण त्याच्या निधनामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या गुरुप्रसाद यांच्या निधनानंतर पोलीस कसून चौकशी करत आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.