माजी विद्यार्थ्यांचा 27 वर्षांनी पुन्हा भरला वर्ग समता विद्यालयात जुन्या आठवणींना उजाळा देत घेतला स्नेह मिलनाचा आनंद.
AB7
माजी विद्यार्थ्यांचा 27 वर्षांनी पुन्हा भरला वर्गसमता विद्यालयात जुन्या आठवणींना उजाळा देत घेतला स्नेह मिलनाचा आनंद. 
अकोल्यातील वानखडे नगर येथील समता विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडला हृदयाच्या नाजूक कप्प्यात साठवलेल्या आठवणी तब्बल 27/28 वर्षांनी त्याच ठिकाणी त्याच सवंगड्यांसोबत त्याच वातावरणात उलगडला गेल्या, त्यामुळे भावना शब्दांच्याही पलीकडच्या ठरतात..असाच काहीसा अनुभव युवा वर्गाला आला. आठवणींची स्पंदने तशीच साठवत निरोप घेताना अनेकांना गहिवरून आले. माजी “विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन” हा आगळावेगळा उपक्रम अकोल्यातील वानखडे नगर येथील समता विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडला, प्रथमता 1998 व 1999 या बॅच सोबतच 1986 च्या बॅचपासून सुद्धा काही विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते त्यामुळे तब्बल 27 /28 वर्षांनी रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी ‘गेट-टुगेदर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी एकत्र आले. इतक्या वर्षांनी सर्वजण एकत्र आल्यावर हा एक भावनिक वातावरणाचा सोहळा ठरला. वानखडे नगर,दाबकीरोड, अकोला येथील समता विद्यालयात तत्कालीन शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पाचवी ते दहावीपर्यंतचे सर्व शिक्षक भेटल्याने या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बालपण सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले, जुन्या आठवणींना उजाळा देत जे सध्या हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. औक्षण करून आणि शाल, श्रीफळ, मोमेंटो व पुष्पगुच्छ भेट देऊन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना अनेक आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला सध्या कार्यरत मुख्याध्यापिका श्री पाटील मॅडम व इतर शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी शिक्षकांमध्ये श्री सावरकर सर, श्री नाकट सर, श्री उजाडे सर, श्री फोकमारे सर, श्री गाडगे सर, श्री कावरे सर तसेच सौ हाते मॅडम, सौ कडू मॅडम, सौ टिकले मॅडम इ. आवर्जून आले होते. या कार्यक्रमाला आजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नृत्य व गायनाचा कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाचे विद्यार्थी शासकिय नोकरी, पोलिस, सेना, शिक्षक, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, स्पेशालिस्ट, ठेकेदार, हॉटेल मालक असे अनेक लहान-मोठे व्यवसाय करणारे सगळे विद्यार्थी आज एकत्र आले होते. त्यांनी सर्वांनी आपला परिचय दिला व मनोगत व्यक्त केले तसेच जुन्या आठवणींना उजाडा दिला. आपल्या विद्यार्थ्यांनी केलेले परिश्रम व एवढ्या वर्षांनी काढलेली आठवण पाहून सर्व शिक्षक वृंद भारावून गेला होता. आजच्या विद्यार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी ठरले. या कार्यक्रमात मुख्यत्वे माजी विद्यार्थी राजदीप बोदडे, चंद्रकांत तेलंग, योगेश काळे, नितीन वाडीकर, विनोद नवले, नरेश पटोकार, रत्नदीप अबगड, कैलास दुधे, माणकर दादा,
सौ. वंदना, सौ.संगीता, सौ. माधुरी, सौ. नलिनी, सौ. आरती. Adv.सौ. मिनल तसेच इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. आज सगळे दूर गेलेले सर्वजण एकमेकांना भेटत होते,सेल्फी काढत होते, त्यानंतर सगळ्यांनी धमाल मस्ती करून जेवणाचा आस्वाद घेतला व आपले अंगभूत कला प्रदर्शन सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.