माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांचे अपघात दरम्यान निधन
अकोला स्थानिक मुर्तीजापुर मतदार संघातील वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते तसेच त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांकरीता कित्येक शिक्षण संस्था उभारलेले आहे तुकाराम बिडकर यांनी विविध चित्रपट क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक केलेले होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांची मोलाची भूमिका होतीअकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचं निधन झाल्याची माहिती आहे. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ते गुरुवारी (१३ फेब्रुवारी) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत होते. तेव्हा शिवर येथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचे अपघातात निधन झाले. अकोलामधील शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळवर भेटले होते. बावनकुळे यांना भेटून बिडकर दुचाकीने घरी येत होते.
बिडकर यांची दुचाकी शिवर गावाजवळ आली असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू टेम्पोने धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.तुकाराम बिरकड यांनी 2004 ते 2009 या काळात आमदारकी भुषवली होती. मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते.,