क्रीडा व मनोरंजनदेश विदेश

IND A vs AUS A : कॅप्टन ऋतुराज सलग दुसऱ्या डावातही फ्लॉप, टीम इंडियाची अडखळत सुरुवात

Ruturaj Gaikwad Dismissed On 5 Runs : टीम इंडिया ए चा कर्णधार ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या पहिल्या अनधिकृत सामन्यातील दुसर्‍या डावात अपयशी ठरला आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-2025 टीम इंडिया ए आधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ए ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात पहिला अनधिकृत कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिल्या डावात 107 धावांवर ऑलआऊट करुन प्रत्युत्तरात 195 रन्स करत 95 धावांची निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. टीम इंडियाचा कॅप्टनदुसऱ्या डावातही अपयशी ठरला. ऋतुराजला पहिल्या डावात तर भोपळाही फोडता आला नाही. ऋतुराजने दुसऱ्या डावात खातं उघडलं, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही.

ऋतुराज पहिल्या डावात झिरोवर आऊट झाल्याने त्याच्याकडून दुसऱ्या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. तसेच 88 धावांनी पिछाडीवर असल्याने मोठी खेळी करण्याचं दडपणही होतं. मात्र ऋतुराज त्यात अपयशी ठरला. ऋतुराजच्या रुपात भारताने दुसऱ्या डावात पहिली विकेट गमावली. फर्गस ओ नील याने ऋतुराज गायकवाड याला कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट याच्या हाती 5 धावांवर कॅच आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर भारताने 30 धावांवर दुसरी विकेट गमावली. अभिमन्यू ईश्वरन 12 धावांवर बाद झाला.

त्यानतंर साई सुदर्शन आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी नाबाद शतकी भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 2 विकेट्स गमावून 43 षटकांमध्ये 146 धावा केल्या आहेत. मुंबईने यासह 58 धावांची आघाडी घेतली आहे. तर साई सुदर्शन 122 बॉलमध्ये 4 फोरसह 62 रन्सवर नॉट आऊट आहे. तर देवदत्त पडीक्कल याने 104 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन:नॅथन मॅकस्विनी (कॅप्टन), सॅम कोन्स्टास, मार्कस हॅरिस, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, कूपर कोनोली, जोश फिलिप (विकेटकीपर), फर्गस ओ नील, टॉड मर्फी, ब्रेंडन डॉगेट आणि जॉर्डन बकिंगहॅम.

टीम इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन::ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इश्ववरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, बाबा इंद्रजीथ, इशान किशन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, मानव सुथार, नवदीप सैनी, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.