सात वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार
खामगांव : शहरात एका सात वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलिस तपास सुरू आहे.पीडित मुलाच्या नाते वाईकाने ने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यांचा ७ वर्षीय मुलगा हा किराणा दुकानात चहा पावडर आणण्यासाठी गेला असता एका अज्ञात इसमाने त्याला झुडपां मागे ओढून नेले व त्याच्यावर अत्याचार केला. दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पीएसओ जाधव व तपास अधिकारी संजय उदासी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, आरोपीचे संपूर्ण नाव अद्याप अस्पष्ट असून, तो चेहऱ्याने ओळखीचा असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. पोलिसांनी शोधमोहीम सुरू असून, लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील तपास शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय उदासी हे करीत आहेत.