हज यात्री प्रशिक्षण व लसीकरण शिबिर
अकोला – हज यात्रेला जाण्यापूर्वी, अकोला हज टूर्सने स्थानिक लकडगंज येथील कोहिनूर फंक्शन हॉलमध्ये हज प्रशिक्षण शिबिर आणि यात्रेकरूंचे लसीकरण आयोजित केले. बुधवार, १४/५/२०२५ रोजी हज यात्रेकरूंसाठी एक विशेष लसीकरण आणि प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. त्याचा फायदा यात्रेकरूंनी घेतला. हा कार्यक्रम अकोला हज टूर्स, सि एच जि ओ ट्रॅव्हल्स एक्सप्रेस ऑन हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.द्वारे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार साजिद पठाण यांनी हजला जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंचे अभिनंदन केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती डॉ.तरंगतुषार वारे यांनी मार्गदर्शन केले. अकोला हज टूर्सचे संचालक अझीम फलाई यांनी हज यात्रेबाबत यात्रेकरूंना योग्य मार्गदर्शन केले. आयमान अब्दुल्ला अब्दुल अजीम, अबू बकर सिद्दिकी, अय्याज अहमद खान, युसूफ खान, मुजम्मिल शाह आणि इतर अनेकांनी या कार्यक्रमात सहकार्य केले.
———————————————————