ऑपरेशन सिंदूर हा मातृशक्तीच्या सन्मान सोबत राष्ट्र चेतना व सर्व हिंदुस्तानी एक आहे ही भावना जागृत
AB7
ऑपरेशन सिंदूर हा मातृशक्तीच्या सन्मान सोबत राष्ट्र चेतना व सर्व हिंदुस्तानी एक आहे ही भावना जागृत
अकोला ऑपरेशन सिंदूर हा मातृशक्तीच्या सन्मान सोबत राष्ट्र चेतना व सर्व हिंदुस्तानी एक आहे ही भावना जागृत करणारी शक्तीचा प्रगटीकरण भारतीय सेनेने करून देशाचा सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदी असल्याचा सिद्ध करून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा निर्माण करू ही देश सनातन धर्माची परंपरा करणारी शक्ती जागर करणारी असल्याचं कृतीने सिद्ध केल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी प्रतिपादन केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने महानगर व ग्रामीणच्या वतीने जिल्ह्यात तिरंगा यात्रा यामध्ये पाच हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी होऊन जिल्ह्यातील 50000 घरापर्यंत संपर्क करून 120 किलोमीटर ही यात्रा अभिनव पद्धतीने व देशाच्या सेनेच्या शौर्याचा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सक्षम असल्याचा भारतीय जनता पक्षाने कृतीने जिल्ह्यातसिद्ध केले. 110 सैनिक माजी सैनिक परिवारयांचा सन्मान आशीर्वाद सुद्धा यावेळी भाजप नेत्यांनी घेतले.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात योग्य नियोजनामध्ये 25 ठिकाणी तिरंगा यात्रा जिल्ह्यामध्ये करण्यात आली आज देश स्वतंत्र काळामध्ये जागृत पारस निंबा फाटा बोरगाव मंजू, चोहट्टा बाजार या भागात यात्रा काढून या यात्रेचा समापन करण्यात आला
आमदार रणधीर सावरकर बोरगाव मंजू तसेच चोहोटा बाजार तिरंगा यात्रे सहभागी झाले तर पारस आणि निंबा इथे खासदार अनुप धोत्रे यांनी सहभाग नोंदविला तसेच जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर, किशोर पाटील यांनी सुद्धा सहभाग घेतला.
आमदार प्रकाश भारसाकले, यांनी अकोट शहर अकोट ग्रामीण, हिवरखेड, तेल्हारा या इथे यात्रेत सहभाग नोंदविला तर आमदार हरीश पिंपळे व खासदार अनुप धोत्रे यांनी बार्शीटाकळी मुर्तीजापुर कुरणखेड येथे सहभाग नोंदविला आमदार वसंत खंडेलवाल यांनी अकोला महानगरात खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल यांच्यासोबत यात्रेमध्ये सहभाग घेतला.
जिल्ह्यात ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत पुष्पवृष्टीने तसेच अनेक ठिकाणी राष्ट्रभक्तांचा वेगवेगळ्या पद्धतीने पाहुणचार करून ढोल ताशे आतिषबाजी ने स्वागत करून भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सेनेचा विजय असो पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो जय श्रीराम दुर्गा माता की जय या गगनभेदी जय घोषाने अकोला जिल्हा दुमदुमला.
भारतीय जनता पक्षाची नक्कल करण्याचा प्रकार विरोधी पक्ष पक्ष करत असले तरी विरोधी पक्षाची नीती त्यांची वृत्ती पाकिस्तानी भाषा जनता जनार्दन ओळख ओळख असल्याचेही आमदार सावरकर यांनी सांगून यात्रेला जिल्ह्यामध्ये जनतेने दिलेला प्रतिसाद आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आपुलकी सैनिकाच्या शौर्याबद्दल सेनेच्या तिन्ही जगाबद्दल अभिनंदन गौरव त्यांच्या कामगिरीबद्दल स्वाभिमान व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशनला सिंदूर हे नाव घेऊन आतंकवाद्यांनी धर्म विचारून 26 जणांची हत्या केली व मातृशक्तीला सांगितल की मोदी को जाके कहो त्याचा उत्तर पाकिस्तान मध्ये जाऊन आतंकवाद्यांचा खात्मा करून भारतीय सेनेने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं तसेच करून अनुचाचणीचा भीती दाखवण्याची ताकद नष्ट केली चीन आणि तुर्की राष्ट्राला सुद्धा त्यांची जागा दाखवण्याचं काम भारत सरकार आणि सेनेने केल्याबद्दल त्रिवार अभिनंदन सुद्धा ठिकठिकाणी भाजप तिरंगा यात्रेच्या दरम्यान करण्यात आला या यात्रा ला यशस्वी करण्यासाठी माधव मानकर, मंगेश दुतोंडे कपिल खरप, गणेश लोड विठ्ठल वाकोडे प्रवीण हगवणे हर्षद साबळे, किशोर कुचके हरीश तावरी, नितीन लांडे, एडवोकेट देव आशिष काकड, उमेश पवार चंदा शर्मा वैशाली निकम, प्रशांत ठाकरे, अमोल गीते तुषार भिरड ,गोपाल महल्ले मनीराम ताले कृष्णा शर्मानंदकिशोर राऊत संकेत राठोड आम्रपाली उपरवट राजेश रावणकर डॉक्टर संजय शर्मा, पवन महल्ले, रमेश अल्करी, चंद्रकांत अंधारे, रमण जैन, राजेश नागमते विवेक भरणे, पंकज वाडी वाले, राजेश ठाकरे, मधुकर पाटकर पवन वर्मा, दत्तू पाटील, माधव बकाल, गजानन नळे, गोविंद गोयंका, राजेश बेले डॉक्टर शंकरराव वाकोडे, विठ्ठल चतरकर, डॉक्टर अभय जैन, एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर सिद्धार्थ शर्मा, निलेश मनोरे निनोरे दिलीप मिश्रा संतोष पांडे आदींनी अर्थक परिश्रम घेतले