क्रीडा व मनोरंजनदेश विदेश

IPL 2025 : आयपीएल मेगा लिलावात आता नव्या नियमाची अंमलबजावणी, खेळाडूंना होणार थेट फायदा

आयपीएल 2025 स्पर्धेच्या तयारी आता सुरु झाली आहे. स्पर्धेला अजून चार महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी त्यासाठीची पूर्वतयारी सुरु झाली आहे. मेगा लिलावामुळे प्रत्येक संघाला संघ बांधणी करावी लागणार आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला 6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. त्यात संघाकडे किमान 18 खेळाडू असणं गरजेचं आहे. त्यामुळे उर्वरित 12 खेळाडूंसाठी बोली लावावी लागणार आहे.

आयपीएलच्या 18व्या पर्वाची पूर्वतयारी सुरु झाली असून रिटेन्शन यादी सोपण्याची 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे दहा फ्रेंचायझींनी कोणते खेळाडू रिटेन केले आणि कोणते रिलीज याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेनंतर आयपीएल मेगा लिलावासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होईल.

आयपीएल मेगा लिलावात यंदा एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. त्याचा थेट फायदा खेळाडूंना होणार आहे. लिलावात खेळाडूंसाठी किमान 30 लाखांची बोली लावावी लागणार आहे. यापूर्वी बेस प्राईज 20 लाख रुपये होती. मात्र यावेळी यात 10 लाखांची वाढ करण्यात आली आहे. तसेच कमाल मूळ किंमत ही 2 कोटी रुपये असणार आहे.

प्रत्येक फ्रेंचायझीला खेळाडूंसाठी 120 कोटी रुपये खर्च करता येतील. पाच रिटेन खेळाडूंसाठी 75 कोटी द्यावे लागतील. पहिल्या रिटेन केलेल्या खेळाडूसाठी 18 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 14 कोटी, तिसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी असतील. पण चौथ्या आणि पाचव्या खेळाडूसाठी अडजेस्टबल किंमत असणार आहे. म्हणजे एक नंबरच्या रिटेन केलेल्या खेळाडूला जास्त पैसे द्यावे लागले तर त्यांच्या वाट्यातील पैसे कमी होतील.

दोन अनकॅप्ड खेळाडू रिटेन करता येतील. एका खेळाडूसाठी 4 कोटी मोजावे लागतील. दरम्यान आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल तर त्या मॅचसाठी 7.5 लाख रुपये मिळतील. साखळी फेरीतील 14 सामन्यात प्लेइंग 11 चा भाग असेल तर 1.05 कोटी मिळतील. त्यामुळे अनकॅप्ड प्लेयरला दोन पद्धतीने पैसे मिळतील.

मेगा लिलाव 24 किंवा 25 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये 18व्या पर्वासाठी मेगा लिलाव पार पडेल. येथे आयपीएलच्या खेळाडूंचा भविष्याचा फैसला होईल.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.