ताज्या घडामोडी

जमीन लाटण्याचा कट उघडपोलिस निरीक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल

AB7 वनिता येवले

जमीन लाटण्याचा कट उघडपोलिस निरीक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल

 

पुणेवाघोली येथील १० एकर जमीन हडपण्याच्या उद्देशाने फौजदारी गुन्ह्यास पात्र असा कट रचून बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे. संबंधित निरीक्षक सध्या नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.सरकारतर्फे चंदननगर पोलिसठाण्यातील महिला पोलिस निरीक्षकानेतक्रार दाखल केली आहे. त्यावरूनचंदननगर पोलिसांनी आनंदलालासाहेब भगत, शैलेश सदाशिवठोंबरे, पोलिस निरीक्षक राजेंद्रसावरसिद्ध लांडगे, अपर्णा यशपालवर्मा उर्फ अपर्णा पटेकर यांच्यावरगुन्हा दाखल केला आहे. भगत यालापोलिसांनी अटक केली आहे,’ अशीमाहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिसआयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.दरम्यान, चंदननगर पोलिसांनी आता केलेल्या तपासात अपर्णा वर्मा नावाच्या महिला निष्पन्न झाल्या आहेत. त्यातील एक अपर्णा यशपाल वर्मा (खरे नाव अर्चना पटेकर) ही सांगली जिल्ह्यातील आणि दुसरी अपर्णा यशपाल वर्मा (खरे नाव, संगीता ससे रा. अहिल्यानगर) ही राजस्थानची असल्याचेप्रकरण नेमके काय ?आनंद भगत याच्या तक्रारीवरून चंदननगर पोलिस ठाण्यात २०२३मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या वेळी राजेंद्र लांडगे तेथे वरिष्ठ निरीक्षक होते.या गुन्ह्याचा तपास सध्या चंदननगर ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्वाती खेडकर यांच्याकडे होता. मात्र, तो खोट्या तक्रारीवरून दाखल केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी भगतच्या घराची झडती घेतली.

 

झडतीत संबंधित जमिनीसंदर्भात कागदपत्रे सापडली. त्याचा तपास करून भगतचा पुन्हा पुरवणी जबाब घेतला असता जागा खरेदी करताना मूळ मालकाच्या जागी बनावट महिला उभी केल्याचे निष्पन्न आले.

 

त्यानंतर भगत याने लांडगे यांना आपल्याला या प्रकरणातून बाहेर काढण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्यात तेव्हा वाद झाले होते.

भगत याने दुबईतील अपर्णा वर्मा या महिलेशी संपर्क साधून दोन कोटी रुपयांचा करारनामा केला. त्यातील ५० लाख रुपये घेतले. त्याबाबत दिवाणी न्यायालयात सेटलमेंट डॉक्युमेंट केले. मात्र, उर्वरित रक्कम भगत याच्या परस्पर शैलेश ठोंबरेने स्वतःच्या खात्यावर घेतली.आरोपींना २०पर्यंत पोलिस कोठडीआरोपींनी गुन्ह्याचा कट कुठे रचला, या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे कोणाचा सहभाग आहे, आरोपींनी बनावट कागदपत्रे कुठे तयार केली, अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करणारी टोळी आहे का, अशा विविध मुद्द्यांचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. ती मान्य करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला २० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 

पॅनकार्डवरून समोर आले. तपासात चौघांनी अर्चना पटेकर या महिलेला अपर्णा यशपाल वर्मा हीच खरी जागा मालक असल्याचे भासवून दस्त

 

नोंदणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे करीत आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.