बालिकेवर अत्याचार करणारा एक अटकेतदुसरा फरारच : बालकामगार कायदा बसवला धाब्यावर
अल्लीपूर : येथील पोलिस ठाण्यांतर्गतये णाऱ्या धागा कंपनीत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सहा दिवसांपूर्वी दोघांनी अत्याचार केला होता. या प्रकरणात तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दुसरा अद्याप फरार आहे.
मोबीन खान, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दुसरा आरोपी जीएम गुरुमूर्ती अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपी फरार होते. आता पोलिसांनी आरोपीचा शोध घेत मोबीन खान याला अटक केली. मात्र, दुसरा आरोपी अजून फरार आहे. १४ वर्षीय पीडिता पॅकिंग खोलीमध्ये काम करत असताना आरोपींनी तिच्या डोळ्यात काहीतरी टाकून तिच्यावर अत्याचार केला.
आठवड्याभरापूर्वी घडली होती धागा कंपनीत आरोपी घटना, एक अजूनही फरार
कंपनीत बालकामगार कामावर कसे?
बालकांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. मात्र, त्या कंपनीने बालकामगार कायद्याची ऐशीतैशी केल्याचे या प्रकरणातून उघड झाले. पोलिसांनीही कंपनी मालकावर कोणताही गुन्हा नोंदविला नसल्याने हे प्रकरणाचे गांभीर्य पोलिस प्रशासनाला तसेच संबंधित विभागाला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियमांनुसार १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही कामावर ठेवता येत नाही. असे असताना कामावर कंपनीने अल्पवयीन मुलीला कामावर ठेवले कसे, अधिकाऱ्यानाही याची माहिती नव्हती का हा प्रश्न आहे.