जातप्रमाणपत्र, आधारसह १५ मागण्यांवर निर्णय
मुंबई : राज्यातील भटके-विमुक्त समाजासाठी जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिर आयोजित केले जाईल. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशन दुकानातून धान्य उपलब्ध होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी दिली.बावनकुळे म्हणाले, ‘भटक्या समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले आहेत. गतवर्षी भटक्या समाजाच्या तांड्यावर दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला. त्यामुळे राज्यभरात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गायरान जमिनीवर भटक्या समाजाची वस्ती आहे, याचा आराखडा पंधरा दिवसांत सादर करावा. त्यांचाही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल.’