महाराष्ट्र

दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था कायालर्याचे उद्घाटन

AB7 करिता अमोल इंगळे मालेगाव

दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था कायालर्याचे उद्घाटन

 

मालेगाव शहरातील सोमवार बाजार येथील मराठी शाळेत खोलीत दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संजय फलनाणी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी अधशाळेचे प्राचार्य पोतदार हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

यावेळी प्रमुख मान्यवरांचा संस्थेच्या अध्यक्ष भरत राऊत आणि सचिव राजेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रहार दिव्यांग संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र खैरनार, योगेश साळुंके, मनीष बडाळे, सुरेश गांगुर्डे, निलेश शिरसागर आदी

 

उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे अध्यक्ष व सचिव यांनी स्वागत केले. यानिमित्त संस्थेतर्फे राननिधी चॅरिटेबात ट्रस्ट यांच्या सहकार्याने मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्या

 

मेडिकल कॅम्प मध्ये ज्या दिव्यांगांना कुत्रिम हात, पाय, कैलिपर, कुबडी आदी गरजेच्या वस्तुबाबत मोजमाप घेण्यात आले. शहर व तालुक्यातील १५० ते २०० दिव्यांगांनी याप्रसंगी उपस्थित

 

राहुन या शिबिराचा लाभ घेत नोंदणी केली आहे. संस्थेतर्फे बैटरी सायकल, साधी सायकल, कानाचे मशीन, वाकन, स्टिक आदी साहित्यांची गरज असलेल्या दिव्यांगांची नॉदगी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत राऊत, सचिव राजेंद्र पवार यांच्यासह भरत गांगुर्डे, सुनिता राऊत, गोविंदा आहेर, नरेंद्र खैरनार, योगेश साळुंखे, निंधा आहीरे, संदीप कदम, राहुत पयार, सलीम शेख, किरण खैरनार, मनीष बहाओं, मोहम्मद आरिफ, संतोष पारख, निशा भावसार, कविता सैदाने, अविनी मार्तड, रत्ना राऊत, राजू बाघ, खालीद बाबा, सनी कापडणीस, शशिकांत मोरे, संतोष ठाकरे आदी दिव्यांग उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.