महाराष्ट्र
पाचोरा : शेतात काम करीत असताना भाऊबंदकीतील शेतकऱ्याच्या मुलाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना
AB7
शेतात काम करताना महिलेचा विनयभंग
पाचोरा : शेतात काम करीत असताना भाऊबंदकीतील शेतकऱ्याच्या मुलाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दि. ६ रोजी सकाळी १०:३० वाजता महिला तिच्या पतीसह शेतात काम करीत असताना शेताशेजारील भाऊबंदकीतील शेतकऱ्याच्या मुलाने पीडितेच्या पतीस फोन करुन विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी लवकर जा, असे सांगितले आणि तिचा पती गेल्यावर विनयभंग केला.