ताज्या घडामोडी

अवैद्यरीत्या रेती उत्खनन करुन (गौण खनिज) ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेतीची वाहतुक करणारे पुलगांव पोलीसांच्या जाळ्यात

AB7 पुलगांव (चिंटू दुवे):-

अवैद्यरीत्या रेती उत्खनन करुन (गौण खनिज) ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेतीची वाहतुक करणारे पुलगांव पोलीसांच्या जाळ्यात

AB7 पुलगांव (चिंटू दुवे):-

 

स्थानिक पोलिसांनी अवैधरित्या रेती चे उत्खनन करणा-या आरोपीतांच्या ताब्यातुन ट्रॅक्टर क. 1 चे चालक याचे ताब्यातून एक जुना वापरता (JOHN DEERE SONALIKA DI 745) जॉन डियर कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर क्र. एम.एच./29/सि./3960 व त्याला लागुन असलेली एक जुनी वापरती निळ्या रंगाची ट्रॉली जियेवर नंबर टाकुन नाही आहे व जिया चेसिस दिसत नाही आहे. त्या ट्रालीमध्ये भरून असलेली अंदाजे एक (1) ब्रास रेती ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शनात पो. हवा. रितेश गुजर ब.क्र. 297 यांनी व पो.स्टाफ तसेच तहसिल कार्यालय पुलगाव येथील ग्राम अधिकारी यांचेसह पी. स्टे. परिसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीर कडुन खबर मिळाले वरुन तळणी भागवत ते हिरापुर जाणा-या कॅनलचे कच्या रोडने दोन ट्रॅक्टर ट्रॉली

 

मध्ये ओली रेती भरुन तळणी भागवत गावाकडे येत आहे अशा माहीतीवरन कॅनल रोडने जात असताना दोन ट्रैक्टर रोडने येताना दिसून आल्याने पो. स्टाफचे मदतीने ते दोन्ही ट्रॅक्टर थांबविला असता सदर ट्रॅक्टरवर चालक नामे ट्रॅक्टर क. 1 चे चालकाचे नाव दिपक रामरावजी हिवरकर, वय 34 वर्ष, रा. घोडेगांव

 

कोळोणा ता. देवळी जि. वर्धा असे सांगितले तसेच सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव ऋषीकेश म्हस्के रा. बोरगाव धांद असे सांगितले. सदर ट्रैक्टर चालक याचे ताब्यातून एक जॉन डियर कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. /29/सि./3960 व त्याला लागुन असलेली एक जुनी वापरती निळ्या रंगाची ट्रॉली त्या ट्रालीमध्ये भरून

 

असलेली अंदाजे एक (1) ब्रास रेती ताब्यात घेण्यात आले. तसेच ट्रॅक्टर क. 2 चे चालकाचे नाव सुनिल भाउराव कौराती, वय 44 वर्षे, रा. शेन्द्री ता. देवळी जि. वर्धा असे सांगितले व सदर ट्रैक्टर मालक जितेन्द्र बापुराव चिंचे रा. तळणी भागवत ता. देवळी जि. बधां हे असल्याचे सांगितले. सदर ट्रॅक्टर चालक

 

पाचे ताब्यातुन एक हिरव्या रंगाचा (SONALIKA DI 745) कपनीचा ट्रॅक्टर ज्याचेवर क्रमांक लिहीलेला नाही तसेच त्याला लागुन असलेली एक जुनी वापरती निळ्या रंगाची ट्रॉली त्या ट्रालीमध्ये भरून असलेली अंदाजे एक (1) ब्रास रेती ताब्यात घेण्यात आले. सदरचे दोन्ही ट्रॅक्टर व रेतीने भरलेले दोन्ही ट्राली पुढील कारवाई करीता पोलिस स्टेशन पुलगाव येथे आणण्यात आले. सदरची कार्यवाही मा. अनुराग जैन पोलीस अधिक्षक सा. वर्धा, मा. डॉ. सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव श्री. राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात श्री. राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांचे मार्गदर्शनाप्रमाणे रितेश गुजर, ओमप्रकाश ताम्रारी, विश्वजीत वानखेडे व तहसिल कार्यालय पुलगाव येथील ग्राम अधिकारी डेहणकर, महाजन व होमगार्ड सैनिक सिध्दार्थ जाधव, रोशन लाकडे यांनी केली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.