परिवाराने साथ सोडल्यानंतर अजित पवारांसाठी बहीण निवडणूक मैदानात, थेट म्हणाल्या…
अजित पवार जेव्हा, जेव्हा मला नमस्कार करतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्यांना एक दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचे मला पाहायचे आहे. त्यांच्यात ती पात्रता आणि गुणही आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होतील.
बारामती मतदार संघातून अजित पवार निवडणूक मैदानात उतरले आहे. त्याचवेळी त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार याला निवडणूक मैदानात उतरवले आहे. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत कुटुंबातील कोणीही नाही. परंतु त्यांच्या सावत्र बहीण रजनी इंदुलकर प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी एक दिवस अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार नुसता बारामतीचा नेता नाही. ते महाराष्ट्राचे नेते आहे. त्यांचे राज्यात नाही तर देशभरात नाव आहे. त्यांच्यासाठी माझा जीव तुटला. त्यामुळे मी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडले. अजित पवार कोणतीही गोष्टी किंवा काम करतात ते सर्वोत्तम करतात. ते खूप मेहनत करतात. सध्याची परिस्थिती पाहून त्यांना वाटत असेल या लोकांसाठी मी दिवस रात्र झटलो. पहाटेपासून रात्रीपर्यंत काम केले. कुटुंबाची पर्वा केला नाही. परंतु आज मला मते मागण्याची वेळ येत आहे. हे दुर्देव आहे.
अजित पवार जेव्हा, जेव्हा मला नमस्कार करतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्यांना एक दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचे मला पाहायचे आहे. त्यांच्यात ती पात्रता आणि गुणही आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी माझी अपेक्षा आहे, असे रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे.