राजकीय

आपण महायुतीत जायला हवे, मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या पुढे मांडली भूमिका

विधानसभा निवडणूकीत एकीकडे महायुतीला 231 मतांचे भरघोस दान मिळालेले असताना मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांची शिवतीर्थ येथे चिंतन बैठक बोलाविण्यात आली होती.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत महायुतीला आश्चर्यकाररित्या प्रचंड मते पडून त्यांचा मोठा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीला पन्नासपेक्षाही कमी जागा मिळाल्या आहेत. तर मनसेचा या निवडणूकीत एकही आमदार निवडून न आल्याने मनसे पक्षाच्या नेत्यांची शिवतीर्थ येथे चिंतन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर मनसेच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या चिंतन बैठकीत राज ठाकरे यांना आपण महायुती जायला हवे अशी मागणी पक्षाच्या नेत्यांनी केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

राज्यात महायुतीचे सरकार येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि आपण महायुती सरकारमध्ये असू असे मनसे नेते राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. परंतू प्रत्यक्षात 23 तारखेला झालेल्या मतदान मोजणी राज ठाकरे यांच्या पक्षाला एक जागा जिंकता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दादरच्या शिवतीर्थ येथे मनसेच्या नेत्यांची चिंतन बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना आपण युतीत जायला हवे असा प्रस्ताव मांडला. आपण महायुतीत थेट सामील नसल्याने आपल्याला मतदानात महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केले नाही. जर आपण महायुतीत थेट सामील असतो तर चित्र वेगळे असते असे मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना सांगितले. राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांचे सगळे म्हणणे ऐकून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनसेची अवस्था

एकीकडे विधानसभा निवडणूकीत महायुतीला भरभरुन मतदान मिळालेले असताना मनसेला आपला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यातच माहीम येथून राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांचाही पराभव झाल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. या विधानसभेच्या निवडणूक निकालांना मनसेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाची मान्यताही धोक्यात आलेली आहे. मनसेने यंदा 125 जागा लढविल्या होत्या. मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही तसेच मनसेला अवघी 1.8 टक्के मते मिळालेली आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.