राजकीय

राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटले? भर सभेत मागचं सगळं काढलं

आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. राज ठाकरे यांची लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटाचा दिवस आहे. प्रचारासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान आज महाराष्ट्र नविर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. तेव्हा जनतेनं काँग्रेस, राष्ट्रवादी नको म्हणून भाजप-शिवसेनेच्या पारड्यात मत टाकलं. मात्र त्यानंतर एक पक्ष उठला आणि स्वत:च्या स्वार्थासाठी विरोधकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत आला. हा तुमच्या मताचा अपमान नाही का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  2019 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. तेव्हा जनतेनं काँग्रेस, राष्ट्रवादी नको म्हणून भाजप-शिवसेनेच्या पारड्यात मत टाकलं. मात्र त्यानंतर एक पक्ष उठला आणि स्वत:च्या स्वार्थासाठी विरोधकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत आला, का तर मुख्यमंत्रिपद पाहिजे म्हणून, हा तुमच्या मताचा अपमान नाही का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की बाळासाहेब देखील अनेकदा आपल्या भाषणांमध्ये मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलले होते. त्यांची देखील मशिदीवरील भोंगे हटवण्याची इच्छा होती. ते काम माझ्या पक्षानं केलं तर यांनी माझ्या सतरा हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. यांना यांचा पक्ष सांभाळता आला नाही, आमदार फुटले त्यांना हे गद्दार म्हणतायेत. अरे गद्दार तर इथे आहे जो घरामध्ये बसला आहे. गद्दारी तर यांनी पक्षासी केली असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.  दरम्यान यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर देखील जोरदार हल्लाबोल केला. बाळा नांदगावकर यांच्या समोरील रेल्वे इंजिनचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.