महाराष्ट्र

सटाणा आगारात २२ सीसीटीव्ही सुस्थितीत पोलिसांनी जबाबदारी चोख बजावावी, प्रवाशांची अपेक्षा

AB7करिता अमोल इंगळे

सटाणा आगारात २२ सीसीटीव्ही सुस्थितीतपोलिसांनी जबाबदारी चोख बजावावी, प्रवाशांची अपेक्षा

 

सटाणा पुणे स्वारगेट येथील बसस्थानकात भल्या पहाटे झालेल्या अनैतिक घटनेने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सटाणा बसस्थानकासह आगारात पाहणी केली असता कुठलीही भीती येथे नसली तरीही दिवसभरात पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावावी, अशी अपेक्षा प्रवासी, महिला व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त७७पैकी एकही बस बंद अवस्थीत नाही.केली जात आहे.सटाणा आगारात असलेल्या ७७ पैकी एकही बस बंद अवस्थेत नाही. नादुरुस्त असलेल्या तरीही बंद अवस्थेत नाही. सर्व बस या सायंकाळनंतर वर्कशॉपमध्ये दाखल होत असतात. सायंकाळनंतरशाळा सुटण्याच्या वेळी पोलिसांची गरज...पहाटे पाच वाजता पहिली बस वर्कशॉपमधून बसस्थानकात प्रवेश करते. मगच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळतो. रात्रभर बस वर्कशॉपमध्ये सुरक्षित असतात. बसस्थानकात पोलिस चौकी नसल्याने महाविद्यालय व शाळा सुटल्यानंतर टवाळकी करणारे विद्यार्थी असल्याने तेव्हा पोलिसांची आवश्यकता असते. ही बाब हेरून आगाराच्या वतीने पत्रव्यवहार केला असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी दिली. याबाबत पोलिस प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.वर्कशॉपमध्ये जाण्यास कुणालाही परवानगी नसते किंबहुना या ठिकाणी असलेले सुरक्षा रक्षक, २२ सीसीटीव्ही सुस्थितीत असे आहेत. बसस्थानक आवारात रात्री-अपरात्री लख्ख प्रकाश असलेले उच्च दर्जाचे दिवे लावलेले असल्याने भीतीचा प्रश्न निर्माण होत नाही.

बनावट ना हरकत दाखला; ग्रामसेवकावर गुन्हा

चांदवड : ग्रामसभा व महिला सभा न घेताकागदोपत्री ठराव करत मद्य विक्रीसाठी ना हरकत दाखला दिल्याप्रकरणी पिंपळदचे तत्कालीन ग्रामसेवक देवीदास पाटील याच्यावर वडनेरभैरव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दिनकर कुमावत यांनी फिर्याद दिली. पिंपळदग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक पाटील यांनी २४ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत ग्रामसभा व महिला सभा न घेता कागदोपत्री बनावट ठराव पारीत केला. तो हॉटेल मालक नीलेश यादव तालापल्लीवार (रा. लासलगाव) यांना बिअर बार व मद्य विक्री परवान्याकामी ‘ना हरकत दाखला’ दिल्याचे फिर्यादीत म्हटले.

बालिकेवर अत्याचार; दहा वर्षांचा कारावास

धुळे : एका अल्पवयीन मुलीवर केल्याप्रकरणी अत्याचार दोंडाईचा पोलिसात दाखल गुन्ह्यातील आरोपी ला सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती यास्मीन देशमुख यांच्या खंडपीठाने दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यावेळी सरकारी पक्षाकडून विशेष अतिरिक्त सरकारी वकील अॅड. शुभांगी डी. जाधव यांनी प्रखर युक्तिवाद केला.दोंडाईचा येथील एका शाळेतील बालवाडीत शिकत असलेली पाच वर्षीय पिडीत बालिका दि. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी शाळेच्या पायरीवर डबा खात असताना, आरोपी रेवनाथ रामसिंग भिल याने चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या मागील बाजूस असलेल्या पडीक घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती.यासंदर्भात आरोपीस अटक करुन त्याच्याविरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण…
अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील वाघोदा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरातून पीडितेला गावातील एका तरूणाने आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी नरडाणा पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास शिंदखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय आहेर करीत आहेत.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.