राजकीय

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे, सर्वाधिक गुन्हेगार कोणत्या पक्षात?

यंदा राज्यातील 288 मतदारसंघात तब्बल 4136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांपैकी तब्बल १९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर ३८ टक्के उमेदवार हे करोडपती असल्याचे बोललं जात आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. यंदा महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. यंदा राज्यातील 288 मतदारसंघात तब्बल 4136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांपैकी तब्बल १९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर ३८ टक्के उमेदवार हे करोडपती असल्याचे बोललं जात आहे.

आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या सुमारे चार हजार उमेदवारांपैकी तब्बल १९ टक्के उमेदवारांवर बलात्कार, महिलांवरील अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर २९ टक्के उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत ३८ टक्के उमेदवार करोडपती आहेत.

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्मस्’(एडीआर) संस्थेने राज्यातील निवडणुकांबद्दल एक ताजा अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार, २८८ मतदारसंघांत २०४ महिलांसह ४ हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच राष्ट्रीय पक्षांचे ४९०, प्रादेशिक पक्षांचे ४९६ आणि २ हजार ८७ अपक्ष मैदानात उतरले आहेत. यापैकी २२०१ उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशीलाच्या विश्लेषणानुसार २९ टक्के उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर १९ टक्के उमेदवारांविरोधात बलात्कार, महिलांवर अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत २०२ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. तर ४८ उमेदवारांकडे साधं पॅनकार्ड नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच ४७ टक्के उमेदवाराचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झाले आहे. तर ४७ टक्के उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तसेच १० उमेदवार अशिक्षित आहेत.

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्मस्’(एडीआर) संस्थेच्या अहवालानुसार, भाजपच्या सर्वाधिक ६८ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गट ६६ टक्के, शिवसेना शिंदे गट ६४ टक्के, राष्ट्रवादी शरद पवार गट ६१ टक्के, काँग्रेस ५८ टक्के आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ५४ उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.