महाराष्ट्र

लहुजी शक्ती सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने दिनांक 01 मार्च रोजी आयोजित मातंग समाजाचे महाराष्ट्रातील पहिले अधिवेशन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आले.

AB7

मातंग समाजाचे महाराष्ट्रातील पहीले अधिवेशन पुणे येथे लहुजी शक्ती सेनेचे आयोजन

अकोला:- लहुजी शक्ती सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने दिनांक 01 मार्च रोजी आयोजित मातंग समाजाचे महाराष्ट्रातील पहिले अधिवेशन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आले.

त्या कार्यक्रमाचे पूर्वतयारी करिता शासकीय विश्रामगृह अकोला येथेआयोजित मिटिंग मध्ये लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री कैलास दादा खंदारे , प्रदेश महासचिव श्री वामनराव भिसे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी अकोला जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. याप्रसंगी

श्री भिकाजी अवचार, अकोला जिल्हा अध्यक्ष प्रकाश दांडगे व पश्चिम विदर्भ महासचिव विष्णू शेलारकर,जिल्हा प्रभारी युवक आघाडी पिंटू अंजनकर जिल्हाध्यक्ष युवक आघाडी राजकुमार ससाने, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ. सरिताताई दुतोंडे, महासचिव महिला आघाडी सौ. आरती ताई हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी सौ. रूपालीताई खडसे , मूर्तीपूर शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ. प्रभाताई सावळे, सौ. सरिताताई स्वर्गी, महानगर अध्यक्ष श्री भाऊराव साबळे, महानगर युवक आघाडी अध्यक्ष अविनाश जाधव, बार्शीटाकळी अध्यक्ष राहुल घनगाव, अकोला तालुका अध्यक्ष दिलीप पाटेकर, अकोला जिल्हा उपाध्यक्ष शाहीर मधुकर नावकर, बाळापुर तालुका युवक आघाडी अध्यक्ष ऋतिक बोरकर, बाळापुर तालुका अध्यक्ष राजेश गायकवाड ,महानगर उपाध्यक्ष गजानन गवई , अकोट तालुकाध्यक्ष लहुजी अंभोरे, दिनेश नपनारायण, विजय अंभोरे, विलास अंजनकर अकोट, गजानन मानकर, संजय वगारे, सुरज अंजनकर ,प्रसन्ना दुतोंडे, रवी भाऊ बांगर हे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.