देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित? आजच होणार शिक्कामोर्तब
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकासआघाडीची गोची झाली आहे. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच आता मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकासआघाडीची गोची झाली आहे. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच आता मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. महायुतीत भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असावा आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे, अशा भावनाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे आज नवी दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याबद्दल महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकार बाबतची रुपरेषा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.