राजकीय

कर्जत जामखेडमधील पराभवावरुन महायुतीत घमासान, भाजपच्या राम शिंदे यांचा थेट अजित पवारांवर हल्ला

Ram Shinde On Ajit Pawar: ढाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झाले असते. त्यावर रोहित पवार म्हणाले, तुमची सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता. या ठिकाणी 1 लाख 27 हजार 676 मते रोहित पवार यांना तर राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. म्हणजेच 1243 मतांनी रोहित पवार विजयी झाले.

Ram Shinde On Ajit Pawar: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. काही ठिकाणी महायुतीच्या उमदेवारांचा पराभव झाला. आता त्या पराभवावरुन महायुतीमधील नाराजी समोर येऊ लागली आहे. कर्जत जामखेडमध्ये महायुतीमधील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा केवळ 1243 मतांनी पराभव झाला. पवार कुटुंबातील रोहित पवार या मतदार संघात विजयी झाले. मतदार संघात युतीचा धर्म पाळला गेला नाही. माझा बळी दिला गेला. कुटुंबात अघोषित करार झाला होता, हे आता सिद्ध झाल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आले आहे.

काय म्हणाले राम शिंदे

अजित पवार यांचे वक्तव्य समोर आले. त्यावरुन कर्जत  माझा बळी गेला हे सिद्ध झाले. मला हे माहिती होते. पण त्यावर विश्वास बसत नव्हता, असे राम शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले, अजितदादा आज बोलले की मी सभेला आलो असतो तर तुझे (रोहित पवार) काय झाले असते हे उघड झाले आहे. रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. महायुतीचा धर्म पाळणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. रोहित पवार बारामतीमध्ये येऊ नये आणि अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये येऊ नये. पवार कुटुंबात अघोषीत करार झाला होता. त्यामुळे खूप कमी मताच्या फरकाने मी पडलो आहे. मी कटाचा बळी ठरलो आहे, असे त्यांनी म्हटले.

महायुतीच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित होणे हे  चांगले नाही. या मतदार संघाची फेरमतमोजणी करण्याचा मी अर्ज केला होता. पण तो त्यावेळी फेटाळला होता. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांककडे अपील करणार आहे. माझ्यासमोर मोठी बलाढ्य शक्ती होती. महायुतीच्या लोकांबरोबर असे होत असेल तर बरोबर नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले.

अजित पवार यांनी काय म्हटले

कराडमधील प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार  यांची भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झाले असते. त्यावर रोहित पवार म्हणाले, तुमची सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता. या ठिकाणी 1 लाख 27 हजार 676 मते रोहित पवार यांना तर राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. म्हणजेच 1243 मतांनी रोहित पवार विजयी झाले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.