महाराष्ट्र

भातकुती तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

AB7

भातकुती। भातकुती तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीचा पाठलाग करून धमकी दिल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…१ मार्च रोजी सकाळी ११.३६ वाजता ही घटना उघडकीस आली. सज्जन दिपक चंदर पा तरुणाने शिंगणापूर येथे पीडितेचा पाठलाग केला आणि जबरदस्तीने तिला बोलावून प्रेमाच्या नावाखाली धमकी दिली. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरती आणि तिने घेट खोलापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 78 (1), 351 (2). 352 तसेच पोस्को कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आता आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात महिलांविरोधातील गुन्यांमध्ये वाढ होत आहे. विनयभंग, छेडछात, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. या परिस्थितीत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, महिता आयोग, पोलिस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था (NGO) पांची भूमिका पुरेशी प्रभावी नसल्याचे चित्र आहे. सरकारने पावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे पुढील अपडेटसाठी पाहात राहा सिटी न्यूज

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.