राजकीय

“एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार होते, भाजपच्या ‘त्या’ नेत्याकडे संपूर्ण यादी”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे हे जेलमध्ये जाणार होते, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे हे जेलमध्ये जाणार होते, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. आम्ही हिंमत केली नसती तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी शिवसेना विकली असती, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती. त्यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“अर्धे लोक जेलमध्ये जाणार”

“एकनाथ शिंदे आणि हे सर्वजण ईडी, सीबीआयला घाबरुन पळून गेले आहेत. यातील अर्धे लोक जेलमध्ये जाणार होते. या सर्वांची यादी भाजप नेते किरीट सोमय्यांकडे आहे. त्यात एकनाथ शिंदेंसह अनेकांची नावे आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. राजकारणात एकनाथ शिंदे यांनी कोणती हिंमत दाखवली हे त्यांनी सांगावे. त्यांनी जे काही केले, ते सर्व पैशाच्या जोरावर केले आहे. सर्व काही मॅनेज केले आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

“कोणताही मोठा पुरावा असू शकतो का?”

“कुणाच्या अंगात आलं होतं, हे अजितदादांनी एकदा तपासावं. अडीच वर्षे आम्ही चांगल्या प्रकारे सत्ता राबवली. पण गौतम अदानी यांना महाविकास आघाडीचं सरकार नको होतं. ही मुंबई, महाराष्ट्र अदानी यांना गिळायचा आहे. विकत घ्यायचा आहे. ओरबडायचा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी अगोदर शिवसेना तोडली. त्यासाठी अदानींचा वापर केला हे या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा सांगत आहेत. शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी तोडण्यामागे गौतम अदानी हे होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे अदानी होते, हे अजित पवार कबूल करत आहेत. यापेक्षा कोणताही मोठा पुरावा असू शकतो का?” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.