क्राईम स्टोरी

महाराष्ट्रात ईडीकडून मोठी कारवाई, देशभरात 50 शाखा असणाऱ्या सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त, काय आहे प्रकरण?

ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या महाराष्ट्रासह देशातील इतर शहरांमध्ये एकूण ५० शाखा आहेत. या सोसायटीत पावणेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी होत्या. एकूण तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवीदारांची अडकली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यावेळी अमंलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. बीड येथील मुख्यालय असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर ही करवाई झाली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोसायटीची ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणात ४९ गुन्हे दाखल आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या जमिनी, इमारती, प्रकल्प आणि मशिनरीचा समावेश आहे. या मालमत्ता सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. सध्या ज्ञानराधाचा अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी कारागृहात आहेत.

सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा को- ऑपरेटीव्ह सोसायटीत २३१८ कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळवल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे त्यांनी वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचेही तपासात दिसून आले आहे. या प्रकरणात मनी लॉड्रिग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीनेही याचा तपास सुरू केला होता.

ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या महाराष्ट्रासह देशातील इतर शहरांमध्ये एकूण ५० शाखा आहेत. या सोसायटीत पावणेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी होत्या. एकूण तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवीदारांची अडकली आहे. ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल आहेत. ज्ञानराधा सोसायटीतून परदेशात पैसा गेल्याचा संशय तपास संस्थांना आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास ईडीकडे देण्यात आला.

अमंलबजावणी संचालनालयाने १० ऑक्टोबर रोजीची मालमत्ता जप्त केली होती. एकूण १००२ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्तेवर टाच ईडीने आणली होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना येथील काही इमारती आणि भूखंड होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.