क्राईम स्टोरी

वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरणे पडले महागात, गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू

जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती.

बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर सरार्स सुरु असल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले.

जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील जखमी तिघांचाही उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. जखमी 10 पैकी तिघांचा उपचार सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. उर्वरित सात जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

रिफिलिंग  चालक दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व वाहन चालक संदीप सोपान शेजवळ अशी मयत तिघांची नावे आहेत. दोघांचा मुंबईत उपचार सुरू असताना तर एकाचा जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधपणे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याची केंद्र ठिकठिकाणी सुरू असून या दुर्घटनेनंतर आता तरी पोलीस संबंधितांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घरगुती वापराचे गॅस सिलिंडरची कमी आहे. त्यामुळे वाहनांमध्ये हा गॅस भरण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. या गॅसचा वापर व्यावसायिक किंवा वाहनांसाठी करता येत नाही. त्यानंतरही काही हॉटेल, टपरी आदी ठिकाणी हे गॅस सिलिंडर वापरले जातात. तसेच वाहनांमध्ये भरले जातात. परंतु त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होत नाही किंवा प्रशासनाकडूनही कारवाई होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीव गमवावा लागत आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.