देश विदेश

पाकिस्तानात रेल्वे स्टेशनवर शक्तीशाली बॉम्ब स्फोट, मोठ्या प्रमाणात मृत्यू, अनेक जखमी

पाकिस्तानात क्वेटा रेलवे स्टेशन मोठा शक्तीशाली बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झालाय. अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.

पाकिस्तानात क्वेटा रेल्वे स्टेशनवर मोठा स्फोट झालाय. या भीषण स्फोटात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. यापेक्षा अधिक संख्येने लोक जखमी झालेत. माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलय. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालय. बॉम्ब निकामी पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलय. घटनेची चौकशी सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटामध्ये दोन बॉम्बस्फोट झालेत. एका स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या स्फोटात जवळपास 15 लोक जखमी झाले. हा बॉम्ब स्फोट कोणी केला? का केला? याची चौकशी सुरु आहे. सध्या या स्फोटांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही. ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी स्टेशन परिसरात मोठी गर्दी होती. कारण इथून एक पॅसेंजर ट्रेन जाणार होती आणि एक पॅसेंजर ट्रेन येणार होती.

स्फोटानंतर क्वेटा रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ झाला. धावपळ सुरु झाली. तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हा मोठा बॉम्ब स्फोट होता. माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस भिंडीच्या दिशेने चाललेली, त्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला.

पाकिस्तानात बॉम्बस्फोट होणं आता सामान्य होत चाललय. तिथे अनेक दहशतवादी गट सक्रीय आहेत. त्यामुळे बॉम्बस्फोट होत असतात. काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच बॉम्बस्फोट झाला होता. पाकिस्तानच्या अशांत नॉर्थ वजीरिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात चार सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झालेले. त्याशिवाय खैबर पख्तूनख्वा येथे एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात दोन लहान मुलांचा मृत्यू झालेला.

त्याआधी पाकिस्तानच्या अशांत बलूचिस्तान भागात एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात पाच शाळकरी मुलांसह सात जणांचा मृत्यू झालेला. 22 जण जखमी झालेले. बाइकवर IED लावून स्फोट झाला होता. या स्फोटानंतर क्वेटामध्ये सर्व रुग्णालयात इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.