पंडित नेहरु यांच्यापासून राजीव गांधीपर्यंत सर्वांचा आरक्षणास विरोध…नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर मोठा आरोप
काँग्रेसने काश्मीरसंदर्भात फुटीरवाद्यांची भाषा बोलू नये. तुमचा हा हेतू पूर्ण होणार नाही. देशात आता कोणीही कलम 370 पुन्हा लागू करु शकणार नाही. बाबासाहेबांची राज्यघटना काश्मीरमध्ये कायम राहणार आहे.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये, असे काम केले. आता त्या परिवारातील युवराज आरक्षणच्या विरोधात आहे. ते आता देशातील ओबीसींना छोट्या छोट्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केला. धुळ्यात शुक्रवारी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
काँग्रेस लहान-लहान जातींना आपआपसात लढवण्याचे काम करत यापूर्वी धर्माच्या नावावर कट रचला. त्यानंतर देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. छोट्या जाती एकत्र राहिल्या तर त्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे मी म्हणतो, एक आहे तर सुरक्षित आहे. आम्ही एकजुट राहून काँग्रेसचा खेळ उधळून लावायचा आहे.
विकासाचा नावावर आम्हाला पुढे जायाचे आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करु इच्छित होते. त्यांना काँग्रेसमधील आजार माहीत होता. काँग्रेस नेहमी देशाला तोडण्याचे कटाचा भाग राहिला आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. काँग्रेसने ७५ वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही. देशात दोन राज्यघटना होत्या. परंतु मोदी आला आणि त्यांनी देशाची राज्यघटना काश्मीरमध्ये लागू केली. काँग्रेस पुन्हा आता जम्मू-काश्मीरमध्ये कट करु लागले आहे. काँग्रेस आघाडी त्या ठिकाणी लागू करण्याचा प्रस्ताव समंत केला आहे. हे देश आता स्वीकारणार नाही