क्राईम स्टोरी

मोठी बातमी! प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात भाऊ प्रकाश महाजनांचा खळबळजक दावा

प्रमोद महाजन यांंच्या हत्येबाबत बोलताना त्यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची 22 एप्रिल 2006 रोजी त्यांचेच बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनं संबंध देशभरात खळबळ उडाली. प्रमोद महाजन यांच्या वरळी परिसरातील पूर्णा या निवासस्थानी ही घटना घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रमोद महाजन यांचे छोटे बंधू प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांच्या निवासस्थानी पोहोचले. प्रवीण महाजन हे फार कमी वेळा प्रमोद महाजन यांच्या घरी येत असत.

मात्र त्या दिवशी ते सकाळीच आले. त्यामुळे प्रमोद महाजन यांना देखील आर्शयाचा धक्का बसला , त्यांनी याबाबत प्रवीण यांना विचारले. दोघांंचं बोलंण सुरू असतानाच, अचानक वाद वाढला आणि प्रवीण महाजन यांनी आपल्या सोबत आणलेल्या पिस्तुलातून प्रमोद महाजन यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर या प्रकरणात प्रवीण महाजन यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

दरम्यान आता या प्रकरणाला आठरा वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. आज प्रमोद महाजन यांंच्या हत्येबाबत बोलताना त्यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं  आहे.

प्रमोद महाजन यांच्या हत्येसंदर्भात बोलताना प्रकाश महाजन यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.  ‘माझ्या भावाच्या हत्येचं षडयंत्र रचणाऱ्या व्यक्तीचा मी जीव घेईन, षडयंत्र रचणारी व्यक्ती पोलादी पडद्याच्या आत आहे. षडयंत्र ज्या व्यक्तीनं केलं त्याच्यामुळे मी माझे दोन भाऊ गमावले.  ती व्यक्ती मला माझ्या हयातीत भेटली, तर एक तर ती व्यक्ती राहील नाहीतर मी राहीन. प्रमोद महाजन यांनी हे सर्व कष्टाने कमावले होते. पण माझ्या धाकट्या भावाच्या मेंदूवर नियंत्रण मिळवून हे कृत्य त्याला करायला लावले. हे षडयंत्र करायला लावणाऱ्या व्यक्तीला मी काय फुलांचे हार देईन का? हे षडयंत्र बाहेर येऊ नये म्हणून घरातील माणसालाच हे कृत्य करायला लावले असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.