मनपा समाज कल्याण विभागाच्या गलथान कारभाराचा दिव्यांगाना फटका*प्रहार दिव्यांग संघटनेने कर्मचाऱ्यांना धारेवर धरत विचारला जाब
AB7 अमोल इंगळे मालेगाव
मनपा समाज कल्याण विभागाच्या गलथान कारभाराचा दिव्यांगाना फटका*प्रहार दिव्यांग संघटनेने कर्मचाऱ्यांना धारेवर धरत विचारला जाब
नाशिक – महानगरपालिका समाज कल्याण विभागाकडून दरवर्षी शहरातील दिव्यांगांसाठी विविध योजना राबवुन राखीव दिव्यांग नीधी त्यांच्या कल्याणार्थ खर्च करण्यात येतो परंतु दिव्यांग लाभार्थ्यांना सहजासहजी हा लाभ मिळत नाही, ही बाब प्रहार दिव्यांग संघटनेचे निदर्शनास आल्याने जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह मनपा समाज कल्याण विभागातील कर्मचारी यांना जाब विचारला एक ते दीड वर्ष उलटून ही पात्र दिव्यांग व्यक्तींची प्रकरणे धुळखात पडुन असतात अंध अपंग यांच्यासह मतिमंद कर्णबधीर व मुकबधीर बांधव आटापिटा करून राजीव गांधी भवन येथे आल्यावर येथील कर्मचारी त्यांच्याशी उध्दट पणे वागतात, तुमचा अर्ज सापडत नाही, पुन्हा नव्याने अर्ज करा, अद्याप मिटींग झाली नाही, असे उत्तर देऊन वेळ मारून नेतात, वर्षे उलटून ही दिव्यांग प्रकरणे मंजूरीस पाठवत नाही, दिव्यांग व्यक्तींच्या समोर कागदपत्रे न शोधता उद्या या नंतर असे सांगून शारीरिक आव्हाने असलेल्या दिव्यांगांना परत पाठवतात ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब असुन दिव्यांग अधिकार कायदा 2016 चे उल्लंघन समाज कल्याण विभागाकडून होत आहे या कडे आयुक्त महोदयांनी स्वतः लक्ष घालून अशा मुजोर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी केली आहे, योजना क्रमांक 2 च्या लाभार्थ्यांनी एक वर्षापूर्वी पडताळणी साठी अर्ज करुन ही कार्यवाही न झाल्याने या बाबत चौकशी केली असता कागदपत्रे सापडत नसल्याचे उत्तर या कर्मचाऱ्यांकडून दिले जाते, येत्या 15 दिवसांत सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास शेकडो दिव्यांग मनपा समाज कल्याण विभागात मुक्काम करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला*या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार, रुपेश परदेशी , पंकज सुर्यवंशी, सुनील पवार, बापु जाधव आदी उपस्थित होते