राजकीय

…तर माझे सर्व उमेदवार मागे घेतो, उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान

मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे. अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आमचे सरकार पाडले, असे ते म्हणतात. परंतु माझे सरकार खूप चांगले काम करत होते. शेतकऱ्यांसाठी काम करत होते. मोदी म्हणतात, मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असेल तर सांगा मी माझे सर्व उमेदवार मागे घेईल, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज बंर वाटल राजेंद्र गवई माझ्या व्यासपीठावर आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि रा.सु. गवई यांनी मैत्री होती. त्यांनी मैत्रीत कधी राजकारण येऊ दिले नाही. मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मला आव्हान दिले.मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधा? मुंब्रा काय महाराष्ट्रात नाही का? मी हे आव्हान स्वीकारतो. मी मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे. परंतु सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. मोदी यांनी माफी मागितली, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही.

मुलींना नाही तर मुलांनाही शिक्षण मोफत देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उच्च शिक्षणसुद्धा मोफत देणार आहे. तसेच मी मुख्यमंत्री असतो तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्ती केली असते. उद्योगातही महाराष्ट्र मागे गेला आहे. नागपूरमधील टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तो फडणवीस यांना वाचवता आले नाही. राज्यातील सर्व काही गुजरातमध्ये जात आहे. राज्यातील युवकांना दर महिन्याला चाळीस हजार रुपये देणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.