राजकीय

जम्मू आणि काश्मीर विधानसभेत कलम 370 वरून जोरदार धुमश्चक्री, कायदेमंडळ झाले कुस्तीचा आखाडा, सत्ताधारी आणि विरोधक आमदार भिडले

जम्मू आणि काश्मीर विधानसभेत गेल्या दोन दिवसांपासून ओमर सरकार आणि विरोधकात अनेक मुद्दांवर खटके उडत आहेत. त्यातच आता कलम 370 वरून विधानसभा हा जणू कुस्तीचा आखाडा होतो की काय, अशी परिस्थिती झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये धक्का बुक्की झाली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकार सत्तेत आले आहे. कलम 370 वरून निवडणुकीतच वातावरण तापले होते. गेल्या दोन दिवसांपासून या मुद्दावर मोठा वाद सुरू आहे. आज या धुसफुसीचे रुपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत गेले. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. कलम 370 वरून धुमश्चक्री उडाली. हे कलम परत घेण्यासाठी वाद उफाळून आला आहे. गुरूवारी दोन्ही गटातील आमदार एकमेकांना भिडले.

जम्मू आणि काश्मीर विधानसभेत गुरुवारी तुफान राडा झाला. कलम 370 वर आमदारांमध्ये झटापट झाली. यावेळी कलम 370 रद्द करण्याची मागणी करणारे पोस्टर फाडण्यात आले. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. पण दोन्ही बाजुचे आमदारांची आक्रमकता पाहता आज विधानसभेच्या कामकाजाला फटका बसण्याची शक्यता आहे. सकाळीच विधानसभेत मोठा हंगामा झाला. त्यानंतर दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले.

आमदार शेख खुर्शीद आज सकाळीच कलम 370 पुन्हा बहाल करण्यात यावे अशी मागणी करणारे पोस्टर घेऊन सभागृहात आले. हे पोस्टर पाहताच भाजप आमदार भडकले. त्यांनी हे पोस्टर हिसकवण्याचा आणि फाडण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन्ही गटात झटापट झाली. भाजप आमदारांनी शेख खुर्शीद यांच्या हातातून पोस्टर हिसकावलेच आणि ते फाडले सुद्धा. त्यानंतर मग सभागृहात तुफान गदारोळ झाला.

कलम 370 आता इतिहास जमा झाल्याचे नेते रविंद्र रैना म्हणाले.  सरकार पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप यावेळी भाजपाने केला. कलम 370 ने जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवाद, अलिप्ततावाद आणि पाकिस्तानी विचारांना खतपाणी घातल्याचा आरोप रैना यांनी केला. हे कलम हटवण्याचा प्रस्ताव असंवैधानिक असल्याचे ते म्हणाले. नॅशनल काँन्फरन्स  हे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.