मनपा, जि.प.च्या निवडणुका पुन्हा लांबणीवरता ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात
AB7, सतीश पवार
मनपा, जि.प.च्या निवडणुका पुन्हा लांबणीवरता ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
स्थानिक स्वराज्यसंस्थांच्यानिवडणुकीसंदर्भातसर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. मात्र, यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. याप्रकरणी आता ४ मार्च रोजी पुढील न सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा
लांबणीवर पडणार आहेत.
दोन्ही बाजूच्या वकिलांनी पुढील सुनावणीसाठी ४ मार्च ही तारीख सुचवली होती. त्यावर न्यायालयाने अनुकूलता दर्शवली. मंगळवारच्या सुनावणीत न्यायालय या संदर्भात
शासनाला, निवडणूक आयोगाला काय निर्देश देणार, याबाबत सर्वांच्याच मनात उस्तुकता आहे. न्यायालय आजच निर्देश देणार की सुनावणीची पुढची तारीख देणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मार्च महिन्यात निकाल आल्यास एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुका ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात..