लाडक्या बहिणींनी’ नाकारला लाभ६१ जणींना नको अनुदान : स्वच्छेने दिले प्रशासनाकडे अर्ज
AB7, करिता कविता वाघ
‘लाडक्या बहिणींनी’ नाकारला लाभ६१ जणींना नको अनुदान : स्वच्छेने दिले प्रशासनाकडे अर्ज
जळगाव : दाराशी चारचाकी आहे. वार्षिकत्पन्नही लाखोंचे आहे. तरीही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीच्या मनात कारवाईची धडकी भरली आहे. म्हणून आतापर्यंत जिल्ह्यातील ६१ जणींनी ‘आम्हाला लाभ नको’ म्हणून प्रशासनाकडे अर्ज सादर केले. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने राज्यस्तरीय समितीकडे अर्ज पाठवून या अर्जदारांचा लाभ बंद केला आहे.१८ महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत.दरम्यान, जळगावमधील ६१ पैकी १८ जणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. दोन्ही अनुदान अडचणीत येतील म्हणून त्यांनी स्वतःहून अर्ज सादर केले आणि ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ नाकारला आहे.लाडकी बहिण’ योजना अंमलात आणल्यानंतर महिलांनी प्रचंड गर्दी केली आणि मोठ्या कसरतीतून अर्ज दाखल केले.एकीकडे बँक खात्यात लाभाची रक्कम जमा होत गेली आणि दुसरीकडे राज्य शासनाने या खात्यांची ‘केवायसी’ची पडताळणी सुरु केली. त्यामुळे तर राज्यस्तरीय समितीकडून अपात्र असूनही या योजनेचा लाभघेणाऱ्यांच्या नावांनाही कात्री लावणे सुरु केले आहे.मात्र नावांना कात्री लागलेल्या लाभार्थ्यांची माहिती राज्यस्तरीय समितीने शासनस्तरावरच ठेवण्याची खबरदारी घेतली आहे.म्हणून स्थानिक पातळीवर या आकड्यांविषयी काही एक माहिती नसल्याचे चित्र आहेयांनी नाकारला लाभप्रकारसंख्यानिराधार योजनेचे लाभार्थी१९स्वच्छेने२३चुकीचे आधारकार्ड०६मयत०३श्रावणबाळ’चे लाभार्थी०२उत्पन्न जास्त०२चारचाकी असलेल्या०३.शासन सेवेत रुजूलाडक्या बहिणींनी अर्ज सादर करून या योजनेचा लाभनाकारला.लाडकी बहीण’ योजना अडचणीत आणेल, म्हणून ६१ जणींनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ नाकारला आहे.