ताज्या घडामोडी

दुसऱ्या मजल्यावर पाणी मारताना तोल जाऊन सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

AB7

दुसऱ्या मजल्यावर पाणी मारताना तोल जाऊन सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

 

 

 

जळगाव : शहरातील चंदू अण्णानगररिसरातील गिरणाई कॉलनी भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर पाणी मारत असताना तोल जाऊन एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मनोहर ढेमा बारेला (वय ३०, रा.उंबऱ्या, ता. भगवानपूर, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे मृत झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.मनोहर बारेला हे गेल्या दीड वर्षापासून शहरातील नरेंद्र साळुंखे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. परिसरातील एका ठिकाणी झोपडीत मनोहर बारेलासह पत्नी व मुले असा परिवार होता. रविवारी रात्री नियमितप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाणी मारत असताना दुसऱ्या मजल्यावरून तोल गेल्याने ते खाली पडले. त्यांना लागलीच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.वॉल कंपाउंडच्या भिंतीवर पडल्याने झाला मृत्यू..तोल गेल्यामुळे खालच्या बाजूला वाळू व इतर बांधकाम साहित्य होते. तर बांधकामाच्या ठिकाणी वॉल कंपाउंडची भिंतदेखील तयार करण्यात आली होती.९वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोणी ढकलल्याचा संशय आहे,मनोहर हे दुसऱ्या मजल्यावरून थेट वॉलकंपाउंडच्या भिंतीवर आदळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी मनोहर ढेमा बारेला यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दुसऱ्या मजल्यावरून कोणीतरी ढकलले. त्यामुळे ते दुसऱ्या मजल्यावरून कोसळले, असा आरोप केला आहे.या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अनिल फेगडे हे करत आहेत.त्यांना लागलीच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.