मस्त जगा.. तुलना करू नका !मत्युपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रू अनावर
AB7, करिता कविता वाघ संगमनेर
मस्त जगा.. तुलना करू नका !मत्युपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रू अनावर
चाळीसगाव ‘आज माझ्याकडे काय नाहीये… गाडी आहे. बंगला, पती क्लास वन अधिकारी मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही… त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोटचा गोष्टींमध्ये आनंदी राहा… तुलना करू नका.. मृत्युपूर्वी काही तास अगोदर समाजमाध्यमांवर लिहिलेली ही भावनिक
पोस्ट आहे. २८ वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची, २७ रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला, गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता.
वडील मनोज आत्माराम पाटील है ग. स. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष. प्रतीक्षा यांचे शिक्षण एमए डी.एड होते. कुसुंबा (ता. जळगाव) येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली. समाजमाध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या ओलावल्या. कढ़ा
२० दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया… अन्
प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या २४ व्या वर्षी यावल वनविभागातील धनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला. ते अळगाव येथेच वास्तव्यास होते. सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले. तीन महिने उपचार सुरूच होते. मात्र, यानंतर जिभेला गाठ झाली. तपासणीदरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले. जीवघेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या. २० दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. यात त्यांची जीभ काढण्यात आली. त्यांचे वजन १० किलोने कमी झाले. आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दाखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २० दिवसांनंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले.
आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात. “मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करती. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो; पण मृत्यूच्या दारातून ओ परत येतो ना.. त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोटया छोटया गोष्टीमध्ये आनंदी राहा. जीवन जगा…” असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मतेची उजेद्रवातचं मृत्यूने विझवून टाकली.