आईच्या डोळ्यातलं पाणी आणि रुग्णसेवकाचा मदतीचा हात!जन्मजात हृदयविकाराशी दोन निष्पाप जीवांचा संघर्ष; मंगेश केनेकर यांच्या प्रयत्नांनी मिळाले नवजीवन
अकोला-पाच महिन्यांचं ते नाजूक बाळ… आईच्या उशाला शांत झोपलेलं, पण प्रत्येक श्वासासाठी संघर्ष करणाऱ्या त्या चिमुकल्याच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह होतं.खामगाव तालुक्यातील अटाळी येथील श्रुतिका डिक्कर आणि नागापूर येथील महेश वासनकर ही दोन बालके जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त होती. त्यांच्या आजाराची कल्पना होताच आई-वडिलांनी अनेक डॉक्टरांकडे धाव घेतली. पण उत्तर सारखंच होतं शस्त्रक्रिया करावी लागेल, पण खर्च लाखोंच्या घरात जाईल शेतमजुरी करणाऱ्या या कुटुंबांसाठी एवढा खर्च शक्य नव्हता. उपाय काहीच दिसत नव्हता. बाळं डोळ्यांसमोर हालताना पाहणं हेच आता त्यांच्या नशिबी होतं.कुटुंब निराशेत असताना चतारी (पातूर)येथील भिकाभाऊ काकड आणि सुनील बदरखे यांनी विवरा (पातूर) रुग्णसेवक मंगेश केनेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.आम्हाला काहीच माहिती नाही… पैसे नाहीत, ओळखी नाहीत, आमच्या बाळांचं काय होईल?” – वासनकर दाम्पत्य अश्रूंना वाट मोकळी करून बोलत होतं.काळजी करू नका, आता ही जबाबदारी आमची आहे!” – मंगेश केनेकर यांच्या या शब्दांनी एक वेगळीच ऊर्जा दिली.
डॉक्टर म्हणाले वेळ निघून गेली तर जीव धोक्यात येईल.मुंबईच्या कोकीळाबेन अंबानी हार्ट केअर सेंटरमध्ये मंगेश केनेकर यांनी या बाळांसाठी तातडीने अपॉइंटमेंट मिळवली.तिथे डॉक्टरांनी सांगितलं एका बाळाच्या हृदयात फक्त एकच पंपिंग चेंबर होतं! मुख्य रक्तवाहिनी चुकीच्या दिशेने वाहत होती, हृदयाला छिद्र होतं! रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नव्हता, त्यामुळे बाळं दिवसेंदिवस अशक्त होत होती शस्त्रक्रिया न झाल्यास बाळं काही महिन्यांचीही राहणार नाहीत!
हे ऐकून आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं… “हे सगळं कसं होणार?”साडेआठ लाख खर्च – पण मंगेश भाऊंनी शक्य केलं मोफत उपचार! या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च साडेआठ लाख रुपयांच्या वर जाणार होता. पण गरीब शेतकरी कुटुंबाला एवढा खर्च परवडणारा नव्हता.
बॉक्स
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे संस्थापक प्रवीण भोटकर आणि सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या मदतीने, मंगेश केनेकर आणि त्यांच्या टीमने राष्ट्रीय बाल सुरक्षा योजनेअंतर्गत या दोन्ही बाळांची मोफत शस्त्रक्रिया सुनिश्चित केली!
शस्त्रक्रियेनंतर आज दोन्ही बाळं ठणठणीत आहेत. त्यांच्या हसण्याने आता घर आनंदाने उजळलं आहे.आईने बाळाला उचलून घेतलं, गालावरून हात फिरवला आणि आनंदाश्रू ढाळत म्हणाली –”माझं बाळ आता बऱं आहे… मंगेश भाऊ, तुम्ही आमच्यासाठी देवदूत आहात!”महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना ही निशुल्क लोकांना मदत करते कुठल्याही आजारासाठी मदत लागल्यास संघटनेशी सपर्क साधावा मंगेश केनेकर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना
+91 99707 22330
—————————————————————–