देश विदेशराजकीय

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी ट्रम्प यांची मोठी खेळी, हिंदुंच्या समर्थनार्थ मोठं वक्तव्य

अमेरिकेत येत्या 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी खेळी केली आहे. त्यांनी हिंदुंच्या मुद्यावरुन मोठ वक्तव्य केलं आहे. असं करुन त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांना अडचणीत आणलं आहे. डोनाल्ड ट्रम्प काय बोललेत ते जाणून घेऊया.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी या प्रसंगी बांग्लादेशमध्ये हिंदुंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. भारतासोबत संबंध अधिक बळकट करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असल्याच त्यांनी सांगितलं. “अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवू. इथे शांतता निर्माण करु आणि अमेरिकेतील हिंदुंच सुद्धा रक्षण करु” असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीकडून कमला हॅरिस निवडणूक मैदानात आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी बांग्लादेशी हिंदुंचा उल्लेख केला. बांग्लादेशात पूर्णपणे अराजकता निर्माण झाल्याच ते म्हणाले.

“बांग्लादेशात हिंदु, ख्रिश्चन आणि अन्य अल्पसंख्यांकांविरुद्ध जो क्रूर हिंसाचार सुरु आहे, त्याचा मी निषेध करतो” असं डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले. “बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले सुरु आहेत. लूटपाट होत आहे. बांग्लादेशात पूर्णपणे अराजकतेची स्थिती आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर हिंदुंच्या मुद्यावरुन मोठा आरोप केला. “उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी जगभरातील आणि अमेरिकेतील हिंदुंकडे दुर्लक्ष केलय असं ट्रम्प म्हणाले. माझं सरकार आल्यानंतर मी भारत आणि माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदींसोबत पार्टनरशिप अधिक भक्कम करीन” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिसवर निशाणा साधताना म्हणाले की, “कमला हॅरिस टॅक्स वाढवून तुमचा छोटा बिझनेस संपवेल. मी आल्यावर टॅक्स कपात करेन” त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. “दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव असून वाईटावर चांगल्याचा विजय होईल” असं ट्रम्प म्हणाले.

पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प हे बांग्लादेशच्या मुद्यावर बोलले आहेत. बांग्लादेशमध्ये मागच्या महिन्यात सत्तापालट झाला. त्यावेळी देशातील स्थिती बिघडली होती. लोकांच्या जमावाने हिंदुंवर हल्ले केले होते. यात अनेक हिंदुंचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले. हिंदुंच्या घरांना आगी लावणं, जाळपोळ अशा घटना सुद्धा बांग्लादेशमध्ये घडल्या.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.