राजकीय

मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी चार दशके राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा, भावनिक वक्तव्य करत म्हटले…

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आले होते. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचे स्थान कमी होऊ लागले. त्यांना सतत दुय्यम वागणूक दिली गेली. त्यामुळे त्यांनी २०२० मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्रातील राजकारणात चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वीश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच यावेळी भावनिक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी हिला विजयी करण्याचे आवाहन केले. खडसे यांनी जवळपास चार दशके जळगाव जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील राजकारण गाजवले. सभागृहातील त्यांची भाषणे प्रचंड गाजली होती.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, मी नाथाभाऊ बोलत आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. मी गेली अनेक वर्षे आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्षे आपण सर्वांनी मला सहकार्य केले आहे. कधी जात-धर्म न पाहता सर्वांना मदत केली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मी पुढची निवडणूक पाहणार की नाही, हे ईश्वरच ठरवेल. परंतु आपण मला जसे सहकार्य केले, तसे सहकार्य रोहिणी खडसे यांना करावे आणि निवडून आणावे, असे भावनिक आवाहन एकनाथ खडसे यांनी केले. यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ एकनाथ खडसे यांनी शेअर केला.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनाथ खडसे राज्यातील भाजप चेहरा होते. पक्षाला वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर खडसे यांचे मोलाचे योगदान होते. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दची सुरुवात कोथडी गावाचा सरपंच (१९८७) म्हणून केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. आमदार, विरोधी पक्षनेते, १२ खात्याचे मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. पक्षात त्यांनी अनेकांना मोठे केले. त्यांच्या शब्दाला दिल्लीपर्यंत किंमत होती.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आले होते. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचे स्थान कमी होऊ लागले. त्यांना सतत दुय्यम वागणूक दिली गेली. त्यामुळे त्यांनी २०२० मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.