आरोग्य व शिक्षण

केसगळती, टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त !*

Akola B7

*केसगळती, टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त !

बुलढाणा : शेगाव तालुक्यातील गावातील केस गळती आणि टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज दुप्पट झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. या विचित्र आणि अनामिक आजाराची रुग्ण संख्या शंभरवर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनामिक आजाराने अकरा गावात शिरकाव केल्याचे चित्र आहे. काल संध्याकाळी रुग्ण संख्या ५१ होती, नंतर ती ६८ झाली होती. दरम्यान, आज शेगाव तालुक्यातील अन्य गावात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ती आज संध्याकाळ पर्यंत शंभर पर्यंत पोहोचली आहे. आज, गुरुवारी जवळा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गतच्या तरोडा कसबा गावात दहा रुग्ण आढळून आले आहे. जलंब केंद्र अंतर्गतच्या माटरगाव आठ, पहरजिरा बारा, नींबी पाच रुग्ण आढळून आले. आज अखेरअकरा गावात शंभर रुग्ण आढळून आले आहे. *पाण्यात नायत्रेटचे प्रमाण जास्त*- यापैकी काही गावातील पाण्याचे नमुने जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाला आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या पाण्यात नायत्रेटचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण एक लिटर पाण्यात दहा मिलिग्राम असायला हवे, मात्र ते प्रमाण चौपन्न मिलिग्राम असल्याचे आढळून आले आहे. तसेच क्षाराचे (टिडीस) प्रमाण एकवीसशे निघाले असून सामान्य स्थितीत ते केवळ एकशे दहा इतके असायला पाहिजे, असे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यावर कळस म्हणजे या पाण्यात घातक असे आरसेनिक व लीड आढळून आले आहे.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.
Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.